धामणगाव रेल्वे
वाद विवाद स्पर्धेत रेखा कोकणे ,अर्पणा तिजारे ,वंदना दहाट तर पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत निधी जीवन रॉय, सुद्धा बेलोणकर ,प्रतीक्षा वैभव शिंदे यांनी अव्वल क्रमांक घेत बक्षिसे मिळवली येथील ऐतिहासिक कार्यक्रमात
लक्ष्मीबाई , मॉ जिजाऊ सावित्रीबाई फुले साकारल्या होत्या.
नगरपरिषद महिला बालकल्याण विभाग व नगराध्यक्षा डॉ. अर्चना अडसड-रोठे यांच्या पुढाकाराने प्रथमच स्व. दादाराव अडसड क्रीडांगण,
येथे जागतिक महिला दिनानिमित्त परिसंवाद, वादविवाद स्पर्धा, फॅशन शो तसेच आनंद मेळावा आयोजित केला होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी पुनम कळंबे. न प. सदस्य मंजिरी भोगे, प्रतिभा खोब्रागडे, मनिषा शिरभाते, रीना साहू, रंजना शेलोकार, सीमा बागडे, प्रियंका जवंजाळ, काजल उपरीकर, सीमा पेंदाम, अंजली मार्वे, यांची उपस्थिती होती. प्रसारमाध्यमांचा आजच्या महिलांच्या जीवनमान व विचारसरणीवर नेमका काय परिणाम होत आहे?,महिला आज खऱ्या अर्थाने आर्थिक व सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र झाली आहे का,?लग्नासाठी आई-वडिलांची संमती कायद्याने बंधनकारक असली पाहिजे का? याविषयी वाद -विवाद स्पर्धा घेण्यात आली यात आपले एकापेक्षा एक प्रखर मत मांडत तब्बल ७० महिलांनी सहभाग घेतला होता. तर पारंपारिक वेशभूषेत मॉ जिजाऊ सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई,रमाबाई आंबेडकर, सिंधुताई सपकाळ, आनंदी जोशी, ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे वास्तव्य मांडणारी शेतकऱ्यांची बायको ,आदिवासी महिलांचे जीवनमान यांचे १४३ महिलांनी वेशभूषा सादर केली होती.पारंपारिक वेशभूषा मध्ये प्रोत्साहन बक्षीस रिता बोरगावकर रमल साकोरे यांना देण्यात आले.
तर डॉ. नगराध्यक्ष अर्चना अडसड- रोठे यांनी व महिला नगरसेवकांनी स्वतः पारंपारिक वेशभूषा साकारत उपस्थित महिलांचा उत्साह अधिक वाढविला. येथे विविध प्रकारचे स्टॉल, सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते.
स्त्री कुटुंबाची नव्हे तर जगाची आधारस्तंभ- अर्चना अडसड – रोठे
तंत्रज्ञानाच्या युगात किती बदल झाला हे जग अधिक पुढे गेले तरी ही जगाच्या इतिहासात स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची आधारस्तंभ आहे. तिच्या कर्तृत्वाची, संघर्षाची आणि योगदानाची दखल पुरुषांनी व आपणं सर्वांनी घेतली पाहिजे या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी असे मत नगराध्यक्ष अर्चना अडसड – रोठे यांनी व्यक्त केले. या महिला दिनाच्या कार्यक्रमाला धामणगाव शहरासह तालुक्यातील पंचक्रोशीतील महिलांची उपस्थिती होती.
