धामणगाव रेल्वे:-
जल पुनर्भरण प्रकल्प ठरला विशेष
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्नित व धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित, आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे यांचे विशेष श्रम संस्कार शिबिर दत्तक ग्राम कासारखेडा हि. येथे दिनांक ३१.०१.२०२६ ते ०७.०२.२०२६ दरम्यान संपन्न झाले.
शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी धामणगाव एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष माननीय शरदकुमारजी अग्रवाल, उपाध्यक्ष रमेशचंद्रजी चांडक, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीपजी लुणावत, सहसचिव डॉ. असितजी पसारी, डॉ. प्रकाशजी राठी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कार तसेच दत्तक ग्राम येथील सरपंच नीलिमाताई पांडे व नितीन मेंडूले व इतर ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी श्री शरदकुमारजी अग्रवाल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून शिस्त, वक्तशीरपणा, नेतृत्व, कर्तुत्व, दातृत्व, वकृत्व आणि परिश्रम यांचे संस्कार होतात, असे विचार मांडले. प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कार यांनी शिबिरार्थीला संबोधित करताना विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासात रा. से. यो. विशेष श्रम संस्कार शिबिराचा मोलाचा मोलाचा वाटा असतो, असे मत व्यक्त केले.
शिबिरा दरम्यान राबवण्यात येणाऱ्या “जल पुनर्भरण ” या विशेष प्रकल्पाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. गावातील सर्व घरांना हा प्रकल्प उभारण्यात यावा व पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत जिरवावे आणि पिण्याच्या पाण्याची पातळी वाढावी हा त्यामागील मुख्य उद्देश होता.
शिबिरदारम्यान प्रार्थना, योगासन, सूर्यनमस्कार, प्रभात फेरी, ग्राम स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता या सारखे अनेक उपक्रम, कार्यशाळा, अनेक बौद्धिक व्याख्यान, मोफत आरोग्य तपासणी, भजनसंध्या, कराओके संगीत, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष लागवड, माझा कचरा माझी जबाबदारी, पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमीन विकास यावर जन जागृती पर कार्यक्रम राबवण्यात आले. शिबिरात “पथ-नाट्य व ग्राम दिंडी” चे अतिशय भव्य स्वरूपाचे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये गावातील सर्वच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. एवढेच नव्हे तर प्रत्येक घरासमोर रांगोळी, इस्टदेवतेचा फोटो ठेऊन श्रम दिंडी चे पूजन करण्यात आले.
शिबिराचा महत्त्वाचा एक भाग म्हणून स्मशानभूमि स्वच्छता व रंग रंगोटी, शिबिरातील सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडला.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. निलेश कडू यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर शिबिराला सदिच्छा भेट दिली व उत्कृष्ट आयोजनाबद्दल रा से यो चमू चे विशेष कौतुक केले. दिनांक ०६.०२.२०२६ बुधवार ला शिबिराचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला धामणगाव एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष ॲड. रमेशचंद्रजी चांडक हे अध्यक्ष म्हणून व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चंद्रशेखरजी पसारी, दत्तक ग्राम येथील सरपंच नीलिमाताई पांडे, उपसरपंच शुभम तरोने, शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. सी. चव्हाण, किशोर परतेकी, सौ. देशमुख, प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थीत्त होते.
प्रतिष्ठित गावकरी मंडळी मध्ये कासारखेडा हि. ग्रामपंचायत चे प्रतिष्ठित पदाधिकारी श्री नितीन मेंढुले , सौ. ढवळे, श्री. सतिश दौतपुरे, श्याम वैद्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. श्वेता ताई सांगोळे व देवदत्त वैद्य यांनी उपस्थित दर्शविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. सह कार्यक्रम अधिकारी डॉ फुरकान पठाण, प्रास्ताविक महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. पूनम गहुकर तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ प्रविण केचे यांनी मानले. या शिबिराचे संपूर्ण आयोजन व नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कार व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रवीण केचे, डॉ. पूनम गहुकर, डॉ. फुरकान पठाण यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले शिबिराकरिता प्रा. विशाल मोकाशे, पूर्वेश वैद्य, अक्षय मुरके, कपिल निहिटे, कुणाल हटवार, प्रज्वल आरेकर, घनश्याम चव्हाण, प्रतिक खांडेकर, रुपेश शिंगाडे, पायल गुप्ता, अनिकेत उईके, मोहम्मद आकिब, आकांशा गवारले, ईशा देव्हारे जागृती महाजन, कोमल आरेकर, प्रीती गोनारकर, यांनी अथक परिश्रम घेतले.
