धामणगाव रेल्वे:-
श्याम बाबांच्या निशाण शोभायात्रेचे धामणगावात ठिकठिकाणी स्वागत धामणगावच्या श्रीबालाजी खाटुश्याम मंदिरामध्ये रंगला फाल्गुन यात्रोत्सव
येथील श्री बालाजी खाटुश्याम मंदिरात रंगरंगीला फाल्गुन यात्रेला सुरूवात झाली असून शुक्रवार (ता.२७) शहरात श्रीश्याम बाबांची भव्य ध्वज (निशान) शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत श्री श्याम भक्त सहभागी झाले होते.
या ध्वज यात्रेने शहर दुमदुमले. येथील जे. बी. पार्क येथील श्री बालाजी-खाटू श्याम मंदिरात गेल्या २० वर्षांपासून फाल्गुन महिन्यातील एकादशीच्या पावन पर्वावर हा रंगरंगीला फाल्गुन मेळा आयोजित केला जातो.फाल्गुन शुक्ल पक्ष नवमी ते फाल्गुन शुक्ल त्रयोदशीपर्यंत चालणाऱ्या य विशाल मेळ्यात दररोज श्री श्यामबाबांची मुर्ती रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित केली जाते. संध्याकाळी श्री श्यामबाबांची पवित्र ज्योत प्रज्वलित केली जाते आणि भव्य भजन संध्या आयोजित केली जाते. दरम्यान शुक्रवार (ता.२७) सकाळी ९ वाजता, रथावर विराजमान असलेल्या श्री श्यामबाबांच्या मूर्तीची भव्य निशाण यात्रा जे.बी. जिन येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत श्री बालाजी-खाटू श्याम मंदिरात पोहोचली. पारंपरिक राजस्थानी वेशभूषेत महिला व पुरुष श्री श्यामबाबांच्या ध्वजा (निशाण) हाती घेऊन सहभागी झाले होते. या यात्रेच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी ज्योत पूजन व जलपान व्यवस्था केली केली होती. हिंगणघाट, वर्धा, आर्वी, पुलगाव, देवळी, अमरावती, यवतमाळ, चांदूर रेल्वे येथून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. श्याम हमारा प्यारा” भजनरचना होणार, २७ फेब्रुवारी बालाघाट (म.प्र.) येथील सुप्रसिद्ध गायिका सोनाली नागेश्वर यांची “श्याम तेरे कितने नाम” भजन संध्या सादर करतील, मधुर आवाजाने भक्तांना भक्तीरसात चिंब केले. त्यानंतर रात्री १० वाजता छप्पन भोग अर्पण व महाआरती झाली.
