धामणगाव रेल्वे:-
हिंदूनी आपल्या धर्म व संस्कृती रक्षणाची जवाबदारी आपल्या घरापासून सुरवात करा व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे आणि समाजापेक्षा राष्ट्र सर्वस्व आहे.मी हिंदू आहे आणि हिंदूस्थान माझा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माँ. जिजाऊ ने जन्माला घालून संस्कारी बनवून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बनविले असे आशीर्वचन प्रख्यात किर्तनकार प्रा. डॉ प्रशांत ठाकरे महाराज अकोला यांनी आपल्या जोशपूर्ण शैलीने सकल हिंदू संमेलन सराफ पार्क दत्तापूर धामणगाव रेल्वे येथे विशाल हिंदू संमेलन स्थळी बोलताना व्यक्त केले
तत्पूर्वी भव्य शोभायात्रा राममंदीर कॉटन मार्केट चौक येथून काढण्यात आली या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांची प्रचंड उपस्थिती,ड्रेस कोड व भगवे फेटे परिधान करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मनमोहक झाकी,भारत माता यांच्या प्रतिमेचे नगरभ्रमण आकर्षण ठरले
विशाल सकल हिंदू संमेलनाच्या मंचावर प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे महाराज अकोला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती जिल्हा बौध्दीक प्रमुख विपीन पाटील, धर्मजागरण जिल्हा संस्कृती सहप्रमुख व संयोजक पं.भैय्या पांडे, सहसंयोजक प्रशांत घाडगे, देवकरण रॉय, सौ.सुवर्णा विलास बुटले, सौ सुनिता भुसारी,सौ. आरती गायकवाड, डॉ.कृष्णा बुटले, अशोक नागरमोते, पद्माकर ठाकरे, पं.सतीश शर्मा उपस्थित होते
याप्रसंगी विपिन पाटील यांनी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू रक्षणाकरिता केलेले कार्य विशद केले
क्रांती वस्ती, कॉटन मार्केट, दत्तापूर या भागातील या हिंदू संमेलनाला महिला पुरुष वृद्ध आणि बालांची प्रचंड गर्दी होती
प्रास्ताविक भैय्या पांडे संचालन राजेश शर्मा यांनी आभार प्रशांत घाडगे यांनी मानले
