मंगरूळ दस्तगीर:-
श्रीराम नवमी निमित्य सुंदरकांड, रुद्राभिषेक, कीर्तन प्रवचन, रामरक्षा व सामूहिक हरीपाठाचे आयोजन
अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात मंगरूळ दस्तगीर हे एक ऐतिहासिक व संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रति पंढरपूर असे गाव आहे त्यामध्ये सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे जागृत श्रीरामाचे मंदिर आहे. येथे दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच. *गुढीपाडवा, श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सवापर्यंत विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम श्रीराम मंदिराद्वारे आयोजित केले जातात.
श्रीराम चैत्र नवरात्र निमित्य श्रीराम मंदिर मंगरूळ दस्तगीर येथे दररोज सकाळी श्रीरामांना रुद्रअभिषेक व पंचोपचार पूजा आणि सायंकाळी रामरक्षा पठण व सामूहिक हरीपाठाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शनिवार दिनांक २१ मार्च रोजी” सुंदर कांड” स्वरदा संगीत विद्यालय, नागपूर महिला मंडळाची प्रस्तुती दू.१२.०० वा.रविवार दि. २२/०३/२०२६ यवतमाळ येथील ह.भ.प. श्री.सदानंदजी देशपांडे यांचे कीर्तन सायं. ७.०० वा. दिनांक . २३,२४,२५मार्च २०२६. रोजी नांदगाव खंडेश्वर येथील मठाचे विश्वस्त अविनाशजी साधू यांचे प्रवचन दररोज संध्याकाळी. ७.०० वाजता. श्रीरामनवमी निमित्य गुरुवार दिनांक २६.३.२६ : ह.भ.प. सौ. मनीषा रवींद्र देशपांडे यांचे नारदिय कीर्तन सेवा आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा सकाळी १०.३० ते १२.०० पर्यंत व सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत भव्य श्रीराम रथ शोभायात्रा, भजन व नयनरम्य आकर्षक दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
करिता सर्व श्रीरामभक्तांनी वरील सर्व कार्यक्रमाकाला उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा.असे आवाहन श्रीराम मंदिराचे विश्वस्त तथा वहिवाटदार शरदचंद्र उर्फ राजु देशपांडे यांनी आवाहन केले आहे.
