धामणगाव रेल्वे:-
नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठे (अक्का) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता महोत्सव माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत नगरपरिषद शालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना नगराध्यक्ष अर्चना अडसड रोटे अक्का व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठे अक्का व उपनगराध्यक्ष बंडू उर्फ गिरीश मुंदडा, गटनेते अण्णाजी चौधरी तसेच पाणीपुरवठा सभापती विलास बुटले व शिक्षण समिती सदस्य प्रियंका जवंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्ष अर्चना अडसड रोठे अक्का यांनी आपल्या भाषणातून सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, सृजनशीलता आणि युवकांना प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन केले. सहभागी कलाकारांच्या कला सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले व भविष्यात अशा उपक्रमांना नगरपरिषदेकडून कायम पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व आयोजकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
