धामणगाव रेल्वे :-
आई- वडीला बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस एस ओ एस कब्स, धामणगाव रेल्वे येथे उत्साहात साजरा
एस ओ एस कब्समध्ये मातृ-पितृ दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या दिवसाचा उद्देश आई- वडील आणि मुलांमधील बंध मजबूत करणे हा आहे. मातृ-पितृ पूजन दिनानिमित्त, मुले आपल्या आई वडिलांना टिळा लावतात, हार घालतात आणि त्यांची सेवा करण्याचा संकल्प करतात.
एस ओ एस कब्समध्येही हा उपक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या फोटोच्या पूजनाने करण्यात आली.या कार्यक्रमाला योग वेदांत समिती, यवतमाळ येथून श्रीमती नीता मुंडाफळे, श्रीमती सविता फाळके, श्रीमती शालिनी पारडे, श्रीमान ओम जैन, श्रीमान राहुल कोहाड आणि श्रीमती मनाली जगधाने तसेच प्री-प्रायमरी हेड माननीय शबाना खान आणि प्राचार्या माननीय प्रचिती धर्माधिकारी या उपस्थित होत्या.
प्री-प्रायमरी हेड शबाना खान आणि प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी अतिथींचे स्वागत वेलकम कार्ड , भेटवस्तू आणि सॅपलिंग देऊन केले.
या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी श्रीमती नीता मुंडाफळे
यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आपल्या जीवनात माता-पित्यांचे महत्त्व अद्वितीय आहे, ते आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे . *प्री-प्रायमरी हेड माननिय शबाना खान* यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, हा दिवस आई-वाडीलाबद्दल सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हे मुलांना माता-पिता बद्दलची आपली कर्तव्ये समजून घेण्यास आणि ती पूर्ण करण्यास साठी प्रेरित करते. कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम आणि बंधन घट्ट करण्यास मदत करते असे सांगितले. शाळेच्या *प्राचार्या माननिय प्रचिती धर्माधिकारी* यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांप्रती कृतज्ञता, आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचे महत्त्व सांगितले व अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजतात असे मत व्यक्त केले.श्रीमती मनाली जगधाने यांनी सुध्दा मुलांना मातृ पितृ दिना निमित्त माहिती दिली.या कार्यक्रमात नर्सरी ते के.जी. २ पर्यंतचे विद्यार्थी आपल्या पालकांसह उपस्थित होते.मुलांनि पालकांच्या कपाळावर कुंकुम तिलक लावला डोक्यावर फुले वाहिली आणि गळ्यात पुष्पहार अर्पण केला. पालकांची सात वेळा प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वाकून विधिवत नमस्कार केला.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना आजच्या धावपळीच्या काळामध्ये शाळेने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच एस ओ एस कब्स मध्ये नेहमीच संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येतात आणि हा उपक्रम दरवर्षी असाच राबविण्यात यावा आणि आम्ही सर्व पालक वर्ग एस ओ एस कब्स चे हा उपक्रम राबविला या बद्दल आभार मानतो असे मनोगत व्यक्त केले.
मातृ–पितृ पूजन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम, भावनिक व प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेणुका सबाने यांनी केले, तर शिक्षिका स्नेहल दुर्गे यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम *प्री-प्रायमरी हेड माननीय शबाना खान* यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. शिक्षिका प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, विशाखा मेंढे, अश्विनी नंदाने, स्नेहल दुर्गे, ऋचा अलवडकर आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला.”
