दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ ला महापारेषन नागपूर सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस.आर) आणि Y4D फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने बेलतरोडी नगरपंचायत कार्यालय बेसा पिंपळा ता. नागपूर जि. नागपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिरास बेलतरोडी,बेसा पिंपळा येथील श्री.दिपक उईके ( महापरेषन ), Y4D फाउंडेशन चे श्री.वैभव , डॉ.अल्मास हैदर , डॉ. उबेद, डॉ. मुस्कान तांबे ,सौ कीर्ती ताई धनराज बडोले (नगराध्यक्ष) श्री. जितेंद्रभाऊ चांदूरकर (नगरसेवक) , श्री. अनुप भेंडे श्री, सुमित सोळंके श्री. अक्षय इंगळे आदि मान्यवर उस्थितीत होते यात 210 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्या मध्ये ३३मधुमेह, ४७रक्तदाब, ४२ डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच ८८ प्राथमिक तपासणी करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आले अश्या प्रकारे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी पार पडले.
