धामणगाव रेल्वे :-
दि.०४ फेब्रुवारी २०२६ बुधवार ला तुळजाभवानी मंदिर तुळजाईनगर धामणगाव रे येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या पुण्यतिथी महोत्सवात सर्वप्रथम श्री मनोहरराव तिनखेडे यांच्या घराजवळुन महाराजाची पालखी काढण्यात आली होती. यामध्ये शारदा महिला भजन मंडळ वडगाव पांडे येथील भजन मंडळ सहभागी झाले होते यात जय राजेश येरपुडे यांनी नरहरी महाराजाची वेषभूषा केली होती. तसेच विठ्ठलाची वेषभूषा प्रिग्गेश मंगेश कुर्वे यांनी तर रुख्मिणीचीसुध्दा वेषभूषा टिना मंगेश कुर्वे यांनी करण्यात आली होती. नरहरी महाराज चौकात पालखी आल्यावर प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी ह. भ. प. नंदकिशोर महाराज हलमारे व संच पिंपळखुटा यांचे काल्याचे सुश्राव्य किर्तन झाले. कलशस्थापना सौ शारदाबाई डुमरे व अनंत डुमरे आणि गजाननराव करुले यांच्या हस्ते करण्यात आली. तदनंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत सचिवपदी शंकरराव कुर्वे व सल्लागार पदी अॅड तुषार मनोहरराव फाळे याची निवड झाल्याबद्दल आणि राज्यस्तरीय हॅडबाॅल स्पर्धेकरीता कु. ईशिका विनोदराव कावळे हिची निवड झाल्याबद्दल, नरहरी महाराज वेषभूषा केल्याबद्दल जय राजेश येरपुडे यांचा सत्कार नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नगर परीषद धामणगाव रे येथुन सेवानिवृत्त झाले ले दिगांबरराव हिरूळकर याचा सुध्दा सत्कार करण्यात आला. तसेच ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल राजा टेंभरे याचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.शेवटी समाजातील दिवंगत स्व. सौ. कुसुमताई शंकरराव कुर्वे, स्व. सुधाकरराव रोठे, स्व. बालाजी वझ्झरकर, स्व. ज्ञानेश्वरराव करुले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माळवी सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गजाननराव करुले, सचिव प्रविण खांडपासोळे, सुवर्णकार विकास महासंघाचे अध्यक्ष विलास रोकडे, कार्याध्यक्ष मनोहर फाळे, सचिव अनंत डुमरे, कोषाध्यक्ष प्रशांत रोकडे, तसेच प्रा. अजय चिंचमलातपुरे, कैलास निबोळकर, अशोक यावले, विठ्ठल शेंदरकर, अनिल ढोमणे, सदाशिव रत्नपारखी, प्रमोद उज्जनकर, निलेश राव रोकडे, ललीत भटुरकर मिलिंद तिनखेडे, मनोज तिनखेडे, किशोर मांडळे, रवीन्द्र डुमरे, रवींद्र मांडळे, विनोद बुटे, राजु बुटे, गजानन बुटे, प्रकाश करुले, पवन बहाळ जगदीश विंचूरकर, अरुण विंचूरकर, सदाशिव रत्नपारखी, महेन्द्र हिरूळकर, रवींद्र टेंभरे, पंकज बाळेकर, राजु रोकडे, श्रीकांत वडनेरकर, अशोकराव लोंधे, सदाशिव निबोळकर, दिलीप तरळकर, राजेश येरपुडे, राम कावळे, शुभम कावळे, हरी कावळे, वसंत टेटे, योगेश टेटे, धनंजय रोकडे, अँड सुरेश फाळे, विवेक भाऊ वझरकर, प्रकाश पाटने,श्री ज्ञानेश्वर कुर्वे, दिगांबर हिरूळकर, मारोत फाळे, गजानन फाळे, राजा टेंभरे, राजु ठोसर, अंकुश डुमरे, आशिष डुमरे, मनोहर फाळे आसेगांव, भागवत ढोरे इ. समाजबांधव व मोठ्या प्रमाणात भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन व आभार अनंत डुमरे यांनी मानले. त्यानंतर महाप्रसाद आणि महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
